एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट

0

कोल्हापूर – उद्धव ठाकरे यांना बाजूला करुन सत्ता स्थापनेसाठी संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या, असं मोठा दावा शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे. संजय राऊतांनी हॉटेल हयातमध्ये दोन बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये अजित पवार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते, असा मोठा खळबळजनक दावा राजू वाघमारे यांनी केला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता, असा गंभीर आरोपही राजू वाघमारे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना बाजूला करुन सत्ता स्थापनेसाठी राऊतांच्या बैठका संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, असाही दावा राजू वाघमारे यांनी केला आहे. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावे केले आहेत. हॉटेल हयातमध्ये संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या. उध्दव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू यासाठी दोन मीटिंग घेतल्या. ज्या पक्षात राहतो त्याच पक्षाच्या नेत्याला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या बैठकीमध्ये उपस्थित होते, असा दावा राजू वाघमारे यांनी केला आहे.

संजय राऊत यांना काहीतरी सिक्रेट माहीत असावे, म्हणून उध्दव ठाकरे काही बोलत नसावेत. संजय राऊत यांनी हे स्क्रिप्ट कोठून आले हे सांगावं. संजय राऊत यांचे नाव आम्ही नारद मुनी ठेवलं आहे, अफवा जास्तीत जास्त कशा पासरवल्या जातील, हे ते करत आहेत, महाराष्ट्र हे जाणून आहे, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

रोज रात्री राष्ट्रीय कार्यक्रम झाल्याने सकाळी हँगओव्हर उतरत नाही. सकाळी नशेत ते रोज बडबडत आहेत. मी एक दिवसाआड एक-एक गोष्ट बाहेर काढणार. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट आखून सिक्युरिटी नाकारली होती, असा गंभीर आरोप राजू वाघमारेंनी केला आहे. शिंदे बाजूला करुन आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते, महाविकास आघाडी असतानाच संजय राऊत यांनी बैठक घेतली. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून बैठक घेतली, असावी त्यांना सगळे पाहिजे होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech