मंत्रालय उपहारगृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ४३ वर्षांची सेवा पूर्ण…!

0

वेटर ते पर्यवेक्षक भूमिका साकारणारे नागेंचे शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती

नागपूर : विधान भवन उपहारगृहामध्ये सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झालेले रविंद्र यशवंत नागे, गेली ४३ वर्षे मंत्रालय उपहारगृहामध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. एवढचं नव्हे तर विधान भवन उपहारगृहातील सर्व कामे सहकारी कर्मचारी यांच्याकडून खेळीमेळीच्या वातावरणात करुन घेण्याची कला नागे यांना चांगल्याप्रकारे अवगत असल्याने अधिवेशन कालावधीत कामाचा कितीही ताण असला तरी पूर्णत्वास नेण्यासाठी नागे यांचा नेहमीच परिश्रम नवखा नाही. आपल्यावर असलेली जवाबदारी चोख आणि जवाबदारीने पार पाडणाऱ्याची भूमिका अंगिकृत असणाऱ्या नागे येत्या जुलै २०२५ ला ४३ वर्षांची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती होत आहेत.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चौरस आहारगृहातर्फे हैद्राबाद हाऊस उपहारगृह, विधान भवन उपहारगृह तसेच राजगृह उपहारगृह चालविण्यात येत असतात. सर्व कामांकडे नागे बारकाईने लक्ष ठेवून असतात, वेळप्रसंगी प्रत्येक उपहारगृहाला भेट देवून खाद्यपदार्थांचा आढावा घेणे तसेच काही मदत लागल्यास आवर्जून ती पूर्ण करणे ही बाब त्यांची अतिशय उल्लेखनीय अशी आहे. नागे यांच्या देखरेखीखाली पर्यवेक्षक, आचारी व वेटर हे उकृष्टरीत्या तयार झाले असून उपहारगृहाचे कामकाज उत्तरित्या सांभाळण्यास सक्षम झालेले आहेत. नागे यांचे सहकारी सर्वश्री. मणिलाल मोर्बेकर, जनार्दन मोरे, प्रकाश कोळी, गोपाल पुजारी, सहदेव पवार, किसन मराडे हे सुध्दा सन २०२५ मध्ये शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झालेले रविंद्र यशवंत नागे, पर्यवेक्षक हे मंत्रालय उपहारगृहामधून दि. ३१ जुलै, २०२५ रोजी नागे हे शासकीय सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजेच हिवाळी अधिवेशन हे त्यांच्या सेवेचे नागपूरचे शेवटचे अधिवेशन आहे. उपहारगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.

दरम्यान विधान भवन दुसरा मजला उपहारगृह व वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत मा. पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहाचे मा. विरोधी पक्ष नेते, मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री, मा. मंत्री, मा. राज्यमंत्री, मा. विधानसभा सदस्य, मा. विधानपरिषद सदस्य, मा. प्रधान सचिव, सचिव, सर्व समिती प्रमुख, सर्व समित्या, विधीमंडळ आणि मंत्रालय अधिकारी, परदेशी शिष्टमंडळे, मा. पिठासीन अधिकारी यांच्या बैठका, मंत्रीमंडळांच्या बैठका, मंत्री महोदयांच्या दालनातील बैठका, अतिमहत्वाच्या व्यक्तींकडे राज्यातून विधान भवनामध्ये येणारे अभ्यांगत यांच्यासाठी विधान भवन २ रा मजला उपहारगृहातून खाद्यपदार्थ, पेय, आहार, अल्पोपहाराची सेवा पुरविण्यात येते. आता मात्र ४३ वर्षांची सेवा पूर्ण करून नागे हे येत्या जुलै २०२५ मध्ये सेवानिवृत्तीच्या होत आहेत…!

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech