रत्नागिरी : यावर्षी नीचांकी तापमानाची नोंद (९ अंश) दापोलीत झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. ऑक्टोबर हीटमुळे उष्ण तापमानात वाढ झाली होती गेल्या महिन्यात पावसामुळे थंडीच्या हंगामालादेखील तशी उशिराच सुरवात झाली आहे. दापोली तालुक्यात गारठा वाढला असून यावर्षी तापमान आणखी खाली आले आहे. त्यामुळे दापोलीकरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या २१ नोव्हेंबरपासूनच तापमानात घसरण होऊ लागली आहे. त्यादिवशी कमाल तापमान १०.९, २७ ला १०.५, २८ ला ९.९, २९ तारखेला ९ अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे. त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गारठला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हवेत भरपूर प्रमाणात गारठा असतो. त्यानंतर सायंकाळी साधारण ५ वाजल्यानंतर गारठा सुरू होतो.