नवी दिल्ली : नाताळच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी समाज माध्यमांवर व्यक्त होत शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आप्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘हा विशेष दिवस आपल्याला येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया आणि करुणेच्या शाश्वत शिकवणीची आठवण करून देतो. या निमित्ताने समाजात समता राखून उत्तम समाज घडवण्याच्या दिशेने वाटचाल करूया असे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.
तर आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, ‘सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभु येशू ख्रिस्तांची शिकवण सर्वांना शांती आणि समृद्धीचा मार्ग दाखवते.’ अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदींनी दिल्या. या शुभेच्छांसोबत भारत कॅथॉलिक बिशप परिषदेत नाताळ साजऱ्या केल्याचा व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी शेअर केला.