चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टची विवेकानंद विचार प्रेरणा अभिवाचन स्पर्धा शारदा विद्यामंदिर ठाणे येथे शनिवारी संपन्न

0

ठाणे : शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना वाचनाकरता प्रवृत्त करावे. त्यामुळे मुलांना उत्कृष्ट वाचन करता येईल. आपली मराठी भाषा अभिजात होती. त्या आपल्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या अभिजात मराठीला अधिक समृद्ध करण्याकरता युवकांनी हातभार लावावा. त्याकरता रोज वाचनाचा सराव करावा आणि अशा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. यातून युवकांची मराठी भाषा प्रभावशाली होईल. असे वृंदा दाभोळकर यांनी शारदा विद्यामंदिर शाळेच्या व्यासपीठावर प्रतिपादन केले. त्या परिक्षक प्रतिनिधी म्हणून संवाद साधक होत्या.

चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि शारदा विद्या मंदिर ठाणे या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी, सायंकाळी ४ वाजता. स्वामी विवेकानंद विचार प्रेरणा हा विद्यार्थी अभिवाचन स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक, पत्रकार, एडवोकेट रुपेश पवार, निवेदिका, लेखिका वृंदा दाभोळकर, मराठा मंडळ ठाणे संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत धायगुडे,हेमंत पत्रे,सुरेंद्र हिलेंक्रर, बाळकृष्ण म्हसकर, प्रविण प्रजापती- शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जाधव हे सर्व मान्यवर उपस्थित होते. शारदा विद्या मंदिरचे समन्वयक पत्रकार राजेंद्र गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मयुरी कदम यांनी बक्षीस वितरण समारंभाचे सुंदर, मधाळ सूत्रसंचालन केले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून हेमाताई दळवी, मोहन हिंदळेकर, वृदा दाभोळकर, मनेश गोडसे, अर्जिता कुलकर्णी, संगीता चौधरी यांनी कार्य पार पाडले. तर स्पर्धा संयोजक म्हणून योगेश्वरी बन,दिपाली बागूरे,वैशाली न्यायनिर्गूणे, सिमा माळकर, व ज्ञानेश्वर पाटील, डॉ प्रतीक्षा बोर्डे, डॉ राणी खेडीकर यांनी कार्यक्रमला सहकार्य केले. तसेच रुपेश पवार यांचे वडील बाल विद्यामंदिर शाळेचे माजी अध्यक्ष बी के पवार आणि रुपेश यांचे आजोबा नथुराम जाधव हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे छायाचित्रन शुभाष जैन यांनी केले.

या स्पर्धेत चौथी ते सहावी गटात प्रथम रतनेश्रवरी बन, दुतीय वेदिका साळुंखे तृतीय मैत्रीय देवधर उत्तेजनार्थ.गागीॅ गोखले,आराधना कोळंबेकर यांना प्रदान करण्यात आला तर दुसरा गट सातवी ते आठवी असा होता. ह्या गटात प्रथम, वेदांत धुरी , दुतीय परी निकम,तृतीय वज्रेश्वरी बन, उत्तेजनार्थ, मालविका पाटील, नविका मराठे,उवीॅ चोरगे,सायली राणे,,गौरी कदम यांना प्रदान करण्यात आले असे एकंदर १३ पुरस्कार या वेळी देण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेंद्र गोसावी म्हणाले. रुपेश पवार यांनी स्वामी विवेकानंद विचार प्रेरणा हा शब्द प्रयोग वापरला आणि माझ्या मनाने उचल घेतली. अशा प्रकारची स्पर्धा आपण घेतली पाहिजे. त्यातूनही संकल्पना आकाराला आली! असे गोसावी सर म्हणाले. त्यांनी उपस्थित पालकांना आवाहन केले. शारदा विद्या मंदिर ही शाळा गरीब व अनाथ मुलांची निवासी शाळा आहे. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पुढाकार घेऊन सर्व प्रकारची मदत मुलांना देत असतात. त्यामुळे आपण सर्वांनी देखील हे समाजकार्य आपल्या हाती घ्यावे आणि फुलना फुलांची पाकळी म्हणून या मुलांच्या सुवीधे करता आर्थिक सहकार्य करावे. गोसावी सरांच्या या विचाराला आपण वाचकांनी आर्थिक मदतीचा हात द्यावा व या क्रमांकावर संपर्क साधावा. ०९९२०७ २४६२७ असे रुपेश पवार यांनी आव्हान केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech