मंत्रिमंडळ विस्तार: फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही – रामदास आठवले

0

नागपूर : आज नागपूरमध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये तिन्ही पक्षाचया नेत्यांनी शपथ घेतली. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मंत्रीमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळं महायुतीत रामदास आठवले नाराज आहेत. मला मंत्रीमंडळ विस्ताराचे निमंत्रण आले नसल्याचे आठवले म्हणाले. मंत्रीमंडळात एक मंत्रीपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचे आठवले म्हणाले.
आज मंत्री मंडळाचा विस्तार होतोय, मात्र मला त्याचं निमंत्रणही नसल्याचे आठवले म्हणाले. निवडणुका आल्या की मला बोलावलं जातं. आमच्या पक्षानेही निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. महायुतीचा मोठा विजय झाला महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. लोकसभेला एकही जागा दिली नाही, विधानसभेलाही एक जागा देऊ असे म्हटले. मात्र तसेही झाले नाही. विस्तारा दरम्यान मला एक MLC देऊन एक मंत्रीपद देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र आम्हाला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत असे आठवले म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech