कॅनबेरा : बीसीसीआयने मोठा निर्णय घेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना भारतात परत पाठवले आहे.हे तीन वेगवान गोलंदाज बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघासोबत होते. पण संघ व्यवस्थापनाला असे वाटले की, ब्रिस्बेन सामन्यानंतर आता फक्त दोन कसोटी सामने बाकी आहेत, त्यामुळे आता त्याचे थांबणे काही योग्य नाही. या ३ खेळाडूंना भारतात परत पाठवण्यात आले आहे. कारण विजय हजारे ट्रॉफी २१ डिसेंबरपासून सुरू होत असून हे सर्व खेळाडू आपापल्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या कसोटी सामन्यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे.ज्यामध्ये तीन मोठ्या खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावस्कर करंडक संघातून तीन प्रवासी राखीव-मुकेश कुमार, यश दयाल आणि नवदीप सैनी यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आपले पुढील सामने मेलबर्न आणि सिडनी येथे खेळेल आणि त्यानंतर मायदेशी परतेल. ऑस्ट्रेलियन दौरा मुकेशसाठी थकवणारा दौरा ठरला आहे, कारण तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपूर्वी दोन सामन्यांसाठी भारत अ संघासोबत येथे पोहोचला होता.यश दयालचा सुरुवातीला राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नव्हता, मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. माहितीनुसार, यशने आधीच ऑस्ट्रेलिया सोडले असून आगामी स्पर्धेसाठी तो उत्तर प्रदेशला जाण्याची तयारी करत आहे. जोपर्यंत सैनीचा संबंध आहे, तो ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर भारत अ संघाचा एकच सामना खेळला आहे आणि तेव्हापासून तो नेट ड्युटीवर आहे.त्यामुळे विजय हजारे ट्रॉफी सामना खेळण्यासाठी या ३ खेळाडूंना भारतात परत पाठवण्यात आले आहे.विजय हजारे ट्रॉफीची २०२५ आवृत्ती २१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि हे सामने आठ यजमान शहरांमध्ये १८ ठिकाणी खेळवले जातील.