अमित शहा व नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाचे १२ जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन…….!

0

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

अनंत नलावडे
मुंबई : येत्या १२ जानेवारीला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमूख उपस्थितीत प्रदेश भाजपचे अधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीचे औचित्य साधून प्रदेश भाजपाने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे.स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या वेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही याच अधिवेशनात भव्य सत्कारही केला जाणार आहे, असेही बावनकुळे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

१० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार

शिर्डी येथील अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याने हे अधिवेशन भाजपाच्या आगामी काळातील योजनांसाठी महत्त्वाचे असेल, असा ठाम विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech