कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजप बाजूला करणार – आघाडीचे उमेदवार रमेश किर यांचा टोला

0

डोंबिवली – महाविकास आघाडी हीच आमची एकत्रित ताकद आहे, हीच आमची मोर्चा बांधणी असून भाजपचे कुठलेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग आहे ,तो म्हणजे भाजपला बाजूला करण्याचा आणि ते निश्चितपणाने या वेळेला या मतदार संघात करून दाखवू असा टोला कोकण पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांनी भाजपाला लगावला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे प्रचाराच्या निमित्ताने कल्याणातील आचार्य अत्रे रंग मंदिरात आले होते. यावेळी बैठकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, शहर प्रमुख शरद पाटील , काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केणे,जितेंद्र भोईर,स्वप्नील रोकडे ,प्रशांत माळी, शकील खान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार किर यांनी सांगितले की,आम्ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढू व जिंकू असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक पदवीधरांचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लढवली जाणार आहे. तसेच शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी आम्ही आग्रही असणार आहोत, पदवीधरांचे प्रश्न ,जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून किंवा स्थानिक उद्योग आहे तिथे स्थानिकांना प्राधान्य देणे, त्याचप्रमाणे यूपीएससी एमपीएससी जिल्हा निहाय सेंटर सक्षम करणे, कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून पदवीधरांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध कशी करून देता येईल यासाठी प्रयत्न करणे , या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech