भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी

0

राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा……..!, प्रदेश काँग्रेसचा थेट मोदी व शहा यांनाच इशारा

मुंबई -अनंत नलावडे

दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा,असा खणखणीत इशारा,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

मारवा यांचे विधान हाच भाजपचा खरा चेहरा असून भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी असल्यानेच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत असतात.आणि आता तर भाजपाने सर्व मर्यादाच सोडल्या आहेत.राहुल गांधी यांच्या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या सारखेच मारु, अशी धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे ही धमकी देणाऱ्या भाजपाचा दिल्लीतील माजी आमदार तरविंदरसिंह मारवाच्या मुसक्या आवळा,अशी आग्रही मागणीही पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की,विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार मारवा याचे विधान अत्यंत आक्षेपार्ह व भडकाऊ आहे.त्यातच गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका असला तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. मुळात तरविंदरसिंह मारवा हा भाजपाच्या नफरतच्या फॅक्टरीत तयार झालेला असून आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

मुळात भाजप व नरेंद्र मोदी यांना थेट भिडणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा असून सत्ताधारी पक्षाला सातत्याने जाब विचारण्याचे काम राहुल गांधीच करत आहेत.लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या विजयाचा रथ रोखण्याचे काम त्यांनीच केले. त्यामुळे खा.राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपा व त्यांच्या आयटी सेलने कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही गांधी यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नसून उलट गांधी यांची विश्वासार्हता नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे. आणि म्हणूनच भाजपाला गांधी खुपतात म्हणनूच त्यांच्या बदनामी साठी मोहिम राबवावी लागते.तरीही राहुल गांधी घाबरत नाहीत म्हणून आता त्यांना संपवण्याचीच भाषा केली जात असल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी थेट मोदी व शहा यांचे नाव घेत केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech