भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा नाशिकमध्ये उद्रेक, आंदोलन

0

नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ व वजनदार नेते छगन भुजबळ यांना काल राज्यात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाशिकमध्ये तीव्रप्रतिसाद उमटले असून ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलनासह निदर्शने करण्यात आली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या राजीनामा देण्याच्या घोषणा देखील केली आहे. रविवारी राज्यातील फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला यामध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातील आमदार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यामुळे स्वतः भुजबळ हे संतप्त झालेले आहेतच पण आता त्यांचे कार्यकर्ते देखील प्रचंड नाराज झालेले आहेत या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सोमवारी थेट रस्त्यावरती उतरत आंदोलने सुरू केली यातील पहिला आंदोलन हे भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला येथे घडले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते भुजबळ यांच्या कार्यालयासमोर आले आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी करून भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान द्यावे अन्यथा सर्व पदाधिकारी हे पक्षाचा त्याग करणारा त्याची घोषणा करण्यात आली. तर भुजबळ समर्थकांनी मतदार संघातील विंचूर या लासलगाव जवळील ठिकाणी नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन केले सुमारे अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ हे रस्ता रोको आंदोलन सुरू होते यावेळी भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान द्या अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान या सर्व घटनांवर चर्चा करण्यासाठी म्हणून माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ मंगळवारी सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना भुजबळ फॉर्म येथे भेटणार आहे त्या ठिकाणी ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech