मुंबई : कुर्ला येथील एल बी एस रोड वर भरधाव वेगातील बेस्ट बस ने अनेक नागरिकांना धडक देऊन चिरडल्याची दुर्घटना मुंबईकरांसाठी चिंताजनक आणि धोक्याची घंटा आहे. अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पुन्हा असे अपघात होणार नाहीत याची सर्व खबरदारी उपाययोजना राज्य सरकार ने कराव्यात. अशी मागणी रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. राज्य शासनाने या बेस्ट बस अपघातात दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये सांत्वन पर निधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या अपघातात जखमींना ही राज्य सरकार ने आर्थिक मदत दिली पाहिजे.या अपघातातील मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने ने घ्यावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
बेस्ट बस चे काही चालक आणि खाजगी बस चे ही चालक बेदरकारपणे बस चालवतात. त्यात अनेक कंत्राटी नवशिके चालक बस चालवीत असतात.अनेक ठिकाणी रिक्षा आणि बेस्ट बस ड्रायव्हर यांच्यात वाद होतात. त्यातून रस्त्यावर ट्रॅफिक आणि वेगवान बस अवजड वाहने चालवण्याचे प्रकार मुंबईकर पादचाऱ्यांना धोकादायक ठरत आहेत .अनेक ड्रायव्हर जे संयम सोडून वेगवान बस चालवतात त्यांच्या बेदरकार वाहन चालविल्या मुळे अनेक स्कूटी ;स्कूटर चालविणारे अपघातात दगावले आहेत.अनेक पादचाऱ्यांना वेगवान बसचालकांचा फटका पडून जीवितहानी झालेली आहे.त्यामुळे बेस्ट प्रशासनाने सर्व चालकांचे मानसिक आरोग्य ही तपासले पाहिजे.राज्य शासनाने सर्व अवजड वाहन चालक खाजगी बसचालक ; बेस्ट आणि एस टी चालकांची तपासणी करून पुन्हा असे अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे. बस अपघातात कुर्ला येथे मृत्युमुखी पडलेल्यांना रिपब्लिकन पक्षातर्फे ना. रामदास आठवले यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.