बीडमधील अपक्ष उमेदवाराचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र त्या दरम्यान बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे बाळासाहेब शिंदे यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील खाजगी रुग्णालयात आणि तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर बसले होते. त्या दरम्यान ही घटना घडली. खंडाळ्यातील मोरवे गावात (जि. सातारा) शाम धायगुडे या मतदाराचे मतदान करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिसऱ्या घटनेत निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या सुमन यादव या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 5 वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या. या तिघांच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात शाम धायगुडे यांचेही असेच हृदयविकाराच्या झटका येऊन निधन झाले. ते 67 वर्षाचे होते.

निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. सुमन संतोष यादव असे मृत महिलेचे नाव असून त्या ३९ वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 5 वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी आज नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 1 येथे होती. सकाळी सुमारे 6.30 वाजता, त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली आल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech