शहापूर प्रहारच्या भजन आंदोलनामुळे, PWD कडून रस्ता दुरुस्ती वेग

0

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

आसनगाव रेल्वे स्थानक म्हणजेच शहापूरला जोडलेल्या दळण वळणाचा महत्त्वाचा रस्ता, मात्र, हाच रस्ता खड्डेमय झाला असून यामुळे शहरांत वाहतूक अत्यंत धिम्या गतीने होत असल्याने शहापूर आसनगाव रस्त्याच्या दुरूस्ती संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भजन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याअनुशंगाने आज शहापूर शासकीय विश्रामगृहामध्ये उप कार्यकारी अभियंता एस.बच्छाव,जेई आणि प्रहार पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने सुरू करण्याचे असल्याचे आदेश दिल्याने नवीन सिमेंट काँक्रीटच्या कामामुळे लवकरच चालू होणार आहे.या आंदोलनाचे पत्र संबंधित उप अभियंता यांना देवून, शांततेच्या मार्गाने केलेले भजनी आंदोलनाला उप अभियंता यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले तसेच प्रहार पदाधिकाऱ्यांच्या वतीने २६ तारखेला होणारे प्रहारचे भजन आंदोलन तात्पुरती स्थगित करण्यात आले आहे. माञ सदर रस्ता खड्डे बुजवून व्यवस्थित न केल्यास लगेचच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे. प्रहारच्या कणखर भूमिकेमुळे शहापूर PWD खाते थेट रस्ता दुरुस्ती करता रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र शहापूर आसनगाव रोडवर पहायला मिळाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech