रोहित शर्माला पाकिस्तानला पाठवण्यावर BCCI ची ICC कडे नवी मागणी

0

मुंबई : यंदा होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा उद्घाटन सामना पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेआधीच्या फोटोशूट व कर्णधारांच्या पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार असल्याची बातमी समोर आली होती. पण बीसिसीआयने रोहितला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. या निर्णयावर बीसीसीआय अजूनही ठाम असून, आता आसीसीकडे एक नवी मागणी केली आहे.

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या उद्धाटन सोहळ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा जाणार नसल्याचे समजल्यानंतर पाकिस्तान बोर्डाचा आणखी एकदा अपमान होणार आहे. याबद्दल बीसीसीसआयने अजून अधिकृत निर्णय कळवला नाही. अशातचं वृत्तानुसार, फोटोशूट व पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्माला बीसीसीआय पाकिस्तान न पाठवण्यावर ठाम असून हे कार्यक्रम दोन वेळा घेण्याची मागणी बीसीसीआने आयसीसीकडे केली आहे. म्हणजेच रोहितचा फोटोशूट व पत्रकार परिषद दुबईमध्ये करण्याची मागणी बीसीसीआयतर्फे करण्यात आली आहे. असे झाल्यास पाकिस्तानवर पुन्हा एकदा नाराज होण्याची वेळ येईल.

हायब्रीड मॉडेलनुसार भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे आधीच पाकिस्तान बोर्ड नाराज आहे. पाकिस्तानला तब्बल ३० वर्षांनी आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले असताना बीसीसीआयमुळे पाकिस्तानच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टी-शर्ट प्रिंट केली आहे, पण या टी-शर्टवर भारताने यजमान देश म्हणजेच पाकिस्तानचे नाव न लिहिल्यामुळे गदारोळ सुरु आहे. त्यांनातर आता उद्धाटन सोहळ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तान जाणार नसून पत्रकार परिषद आणि फोटोशूट कार्यक्रम दोन वेळा घेण्याची मागणी बीसीसीआने आयसीसीकडे केली आहे. आता ही मागणी आयसीसी पूर्ण करणार का हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech