बांग्लादेश सरकार नोटांवरील शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र हटवणार

0

ढाका : बांगलादेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार आणि तीव्र आंदोलनद्वारे शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आले. या हिंसाचारादरम्यान, अनेक ठिकाणी बांग्लादेशचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचे पुतळेही पाडले गेले.हसीना सरकार पाडून बांग्लादेशात सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारने देशातून मुजीबुर रहमान यांची आठवण पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. दरम्यान, बांगलादेशने आपल्या चलनी नोटांवरून माजी राष्ट्रपती आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

बांग्लादेशातील मोहम्मद युनूस सरकारने आपल्या केंद्रीय बँकेला शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.लवकरच नवीन डिझाइन केलेल्या नोटा जारी करण्यात येणार आहेत. वृत्तपत्रानुसार, बँक आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेख मुजीब यांचे सध्याचे चित्र नोटांवरून हटवले जाईल. सुरुवातीला चार नोटांचे डिझाईन बदलले जात आहे. उर्वरित वेगवेगळ्या टप्प्यात बदलले जातील.अर्थ मंत्रालयाच्या फायनान्स इन्स्टिट्यूट विभागाने सप्टेंबरमध्ये नवीन नोटांसाठी तपशीलवार डिझाइन प्रस्ताव सादर केला होता.मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश बँकेत नव्या नोटा छापल्या जात असून, त्यात यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झलक पाहायला मिळणार आहे. या आंदोलनामुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. यानंतर मुहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, अंतरिम सरकारच्या निर्देशानुसार २०, १००, ५०० आणि १,००० च्या नोटांची छपाई केली जात आहे. रिपोर्टनुसार, ‘नव्या नोटांवर ‘बंगबंधू’ शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो नसेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech