मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे नेते बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना रामराम केला असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
बबनराव घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं संपर्कमंत्रीपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आल्यापासून घोलप यांच्या नाराजीची चर्चा होती. त्यांनी पूर्वीही उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. मात्र तो नाकारण्यात आला होता. भाजपाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आल्यापासून घोलप नाराज होते. ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता वाकचौरेंना उमेदवारी मिळू शकेल, या शक्यतेमुळे बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे.
ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात अनुपस्थिती
दरम्यान, गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा आणि अधिवेशनातही घोलप अनुपस्थित असल्याची माहिती आहे. घोलप काही दिवसांत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सांगितलं जात आहे.