नागपूर – नागपुरात आकाराला येणाऱ्या अवादाच्या सौर ऊर्जा -प्रकल्पात 60 टक्के महिला कर्मचारी असतील अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष विनीत मित्तल यांनी दिली. स्थानिक बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील अवादा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या एकात्मिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर संवाद साधताना मित्तल बोलत होते.
यासंदर्भात माहिती देताना विनीत मित्तल म्हणाले की, नागपुरात सुरू होणाऱ्या या प्रकल्पात सुमारे 5 हजारांहून अधिक नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त, अवादा कौशल्य विकासास समर्थन देण्यासाठी स्थानिक आयटीआयसह (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) सह भागीदारीसाठी वचनबद्ध आहे. त्यासोबतच अवादाच्या प्रकल्पामध्ये सुमारे 60 टक्के महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. अवादा सहाय्यक युनिट्सची स्थापना करण्याची योजना आखत आहे, जे सुमारे 1000 रोजगार निर्माण करेल. ग्लास, अल्युमिनियम फ्रेम, जंक्शन बॉक्स आणि इतर घटकांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार्या या युनिट्सने मजबूत घरगुती पुरवठा साखळी सुरक्षित करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना हातभार लावला जाईल असे मित्तल यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दीष्टे चालविण्याच्या अवादाच्या प्रवासात हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. धोरणात्मक भागीदारी, स्थानिक रोजगार निर्मिती आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आम्ही भारताच्या नूतनीकरण योग्य उर्जा व्यवसायाला आकार देण्यास वचनबद्ध आहोत.
अवादाची सुपर फॅक्ट्री ही एक संपूर्ण आधुनिक कारखाना आहे. ज्यात परिवहन सेवा, सुरक्षा उपाय, साइटवरील वैद्यकीय खोल्यांचा समावेश आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर आणि क्रीडा सुविधांचा समावेश आहे. शिवाय सर्व कामगार सुविधांसाठी उच्च दर्जाचे जीवन देण्यासाठीसारख्या सर्व जागतिक दर्जाच्या गोष्टींचा समावेश आहे. प्रकल्पाची जशीजशी प्रगती होत आहे, तसतसे अवादा भारताच्या हरित उर्जा क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास अधिक तयार होत आहे. यावेळी मित्तल यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे विशेष आभार व्यक्त केले. पूर्वीचा महाराष्ट्र औद्योगिकरणाच्या बाबत तितकाची सकारात्मक नव्हता. परंतु, आताच्या सरकारचा ऍप्रोच इंडस्ट्रिअल फ्रेंडली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रात ग्रीन मिथीनॉल पॉलिसी आणायला हवी. त्यावर राज्य परिवहनाच्या बसेस चालू शकतात अशी अभिनव कल्पना मित्तल यांनी यावेळी मांडली.