नवी दिल्ली : प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आराम बापू बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आज त्यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आगामी १५ मार्चपर्यंत हा जामीन देण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणी आसाराम बापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर कराताना आसाराम बापूने आपल्या अनुयायांना भेटू नये असे निर्देश दिले आहेत. आसाराम बापूवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याला यापूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्या जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हंटले आहे.
मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला ह्रदयविकाराचा त्रास होत होता. दरम्यान वैद्यकीय कारणासाठी आसारामला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवून आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या आश्रमात एका महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल त्याला गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले होते.
जोधपूर येथे २०१३ मध्ये ‘पोक्सो’ अंतर्गत आसाराम बापूवर गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईनंतर आणखी एक पीडितेने तक्रार केली. अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमात १९९७ ते २००६ दरम्यान तिच्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप केला. पीडितेच्या लहान बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्काराचा आरोप केला. सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी २०१६ मध्येही आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर एकामागून एक आसारामची गुन्हेगारी उघड झाली. आसारामच्या आश्रमात तांत्रिक विधी होत असत, यासाठीच २००८ मध्ये दोन मुलांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता. मात्र, याप्रकरणी ठोस पुरावे मिळाले नाहीत.