एकट्या महाराष्ट्रात तब्बल ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक

0

मुंबई – अनंत नलावडे
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी शुक्रवारी आपल्या एक्स अकाऊंटवरून संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात एक नंबरवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली असून एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७० हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.तरं दुसर्‍या नंबर वरील कर्नाटक १९ हजार ०५९ कोटी तिसर्‍या नंबर वर दिल्ली १० हजार ७८८ कोटी, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा ९ हजार ०२३ कोटी,पाचव्या नंबरवर गुजरात ८ हजार ५०८ कोटी, सहाव्या नंबर वर तामिळनाडू ८ हजार ३२५ कोटी, सातव्या नंबर वर हरयाणा ५ हजार ८१८ कोटी, आठव्या नंबर वर उत्तरप्रदेश ३७० कोटी, तरं नवव्या नंबर वर,आणि दहाव्या नंबर वर राजस्थान ३११ कोटी अशी असताना या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७० हजार ७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के एकट्या महाराष्ट्रात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्ये १ लाख १८ हजार ४२२ कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) २०२३-२४ मध्ये १ लाख २५ हजार १०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) इतकी होती.तरं राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३ लाख ६२ हजार १६१ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती, याची आठवणही फडणवीस यांनी करून दिली.कारण अडीच वर्षांत आम्ही ५ वर्षांचे काम करुन दाखवू,हे आम्ही पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते.आता सव्वा दोन वर्षांत ३ लाख १४ हजार ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली असून आणखी दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech