ॲपल कंपनी कर्मचाऱ्यांसाठी ७८ हजाराहून अधिक घरे बांधणार

0

मुंबई –  देशभरात गेल्या दोन ते तीन वर्षांत दीड लाख लोकांना रोजगार दिल्यानंतर आता ॲपल कंपनी भारतात चीन आणि व्हिएतनामसारखे औद्योगिक गृहनिर्माण मॉडेल स्वीकारण्याचा विचार करत आहे. या मॉडेलनुसार कंपनी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. फॉक्सकॉन, टाटा आणि सालकॉम्पसह ॲपलचे इतर उत्पादक आणि पुरवठादार त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची योजना आखत आहेत.

ही घरे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत बांधली जातील. या योजनेअंतर्गत ७८ हजाराहून अधिक घरे बांधण्यात येतील. यापैकी जास्तीत जास्त ५८ हजार घरे तामिळनाडूमध्ये तयार होतील. तामिळनाडू स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन (एसआयपीसीओटी) द्वारे बहुतेक घरे बांधली जात आहेत. टाटा समूह आणि एसपीआर इंडियाही घरे बांधत आहेत. योजनेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार १० ते १५ टक्के निधी देईल तर उर्वरित निधी राज्य सरकार आणि व्यवसायांकडून येईल. ३१ मार्च २०२५ पर्यंत बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech