डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न?

0

फ्लोरिडा – रविवारी फ्लोरिडा येथील गोल्फ क्लब येथे गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी ट्रम्प या ठिकाणी असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास फ्लोरिडा येथील गोल्फ क्लबबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्पही याच ठिकाणी गोल्फ खेळत होते, अशी माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ३०० ते ५०० यार्डवर हा हल्ला झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरु होताच सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनीही लगेच हल्लाखोराच्या दिशेने गोळीबार सुरू केला. मात्र, हल्लेखोराला पळून जाण्यात यश आलं. पण पुढे काही तासांतच हल्लेखोराला अटक करण्यात आली. रायन वेस्ली रुथ (५८) असं या हल्लेखोराचं नाव आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत आपण सुरक्षित असल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याने हा हल्ला का केला, याचा तपास करत असल्याचे एफबीआयने सांगितलं आहे. या हल्लानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech