आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी

0

हैदराबाद : अभिनेता सलमान खान याच्यानंतर अनेक सेलिब्रिटींना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. आता दाक्षिणात्य विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा एक मेसेज आणि कॉल आला होता, जिथे अपशब्द वापरले आणि धमकीचा मेसेज देखील पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर संबंधित प्रकरणी कसून चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप कॉल आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

धमकी देण्यामागे नक्की कोणता हेतू असेल. याबाबत देखील काही कळू शकलेलं नाही. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते. अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती जनसेना पक्षाने दिली आहे. पमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांना आगंतकुडी येथून धमकीचे फोन आले.पवन यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली आहे. एका व्यक्तीने दादागिरी करत शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या क्रमाने त्याने आक्षेपार्ह भाषेत धमकीचे मेसेज पाठवले. यानंतर कर्मचा-यांनी धमकीचे कॉल आणि मेसेज उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यासंदर्भातील माहिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech