न्यूयॉर्क – अमेझॉन कंपनीचा संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेफ बेझोस याच्या ५०० कोटी रुपयांच्या यॉट म्हणजेच बोटीवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी बोटीची कसुन तपासणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी या बोटीची जवळजवळ तीन तास तपासणी केली. बोटीवरील सर्व कक्ष, डेक व इतर गोष्टींचीही तपासणी करण्यात आली. ही एक नियमित प्रक्रिया असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून या तपासणी दरम्यान लोरेल ही बोटीतील एका कक्षात विश्रांती घेत होती. नववर्षाच्या स्वागतादरम्यान बेझोस याची ५०० कोटी रुपयांची कोरु ही बोट सेंट बार्ट्स भागात होती. त्या दरम्यान अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटीवर धाड टाकली. यावेळी बेझोस हा त्या बोटीवर नव्हते, तर माजी वृत्तवाहिनी प्रतिनिधी लोरेल ही बोटीवर उपस्थित होती.