मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडून आलेल्या आणि शपथविधीसाठी एकत्रित जमलेल्या आमदारांचे मुंबईत प्रदेश कार्यालयात गुलाबपुष्प देऊन आणि ढोलताशांच्या गजरात शनिवारी जोरदार स्वागत करण्यात आले. प्रदेश कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचे प्रदेश कार्यालयाच्या वतीने कार्यालयात प्रवेश करताना आमदारांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले.
निवडून आलेल्या आमदारांचा आज शपथविधी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सकाळी ९ वाजताच दाखल झाले. या सर्वांना गुलाबी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. शिवाय प्रदेश कार्यालयातून हे सर्व आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनात दाखल झाले.तिथे गेल्यावर सर्व आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभागृहात आमदारकीची शपथ घेतली.