मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता खतरो का खिलाडी अक्षय कुमार हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. अक्षय खन्ना त्याच्या चित्रपट आणि अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कार्यातूनही चाहत्यांची मने जिंकत असतो. अक्षय कुमारने अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या उभारणीसाठी करोडो रुपयांची देणगी दिली आहे. यानंतर ते भगवान श्रीरामाच्या नगरातील माकडांची काळजी घेण्यासाठी पुढे आला आहे . गेल्या महिन्यात त्यांनी अयोध्येतील माकडांच्या सेवेसाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली, जेणेकरून माकडांना अन्न आणि सेवा देता येईल. अक्षय कुमारने ही देणगी अंजनेय सेवा ट्रस्टला दिली. या उपक्रमांतर्गत ट्रस्टतर्फे माकडांना हरभरा, गूळ आणि केळी खाऊ घातली जात आहे, त्याची एक सुंदर झलक अक्षय कुमारने व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘एक छोटासा प्रयत्न’.
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गायींसोबतच अयोध्येत दररोज १२५० हून अधिक माकडांना अन्न दिले जात आहे.अक्षय कुमारने अयोध्येत माकडांच्या देखभालीसाठी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वच स्तरावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. या व्हिडीओने प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. यासोबतच आता अभिनेता अक्षय कुमारचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात त्यांनी अयोध्येतील माकडांच्या काळजीसाठी अंजनेय सेवा ट्रस्टला कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती.अक्षय कुमारनं अयोध्येतील माकडांच्या काळजीसाठी अंजनेय सेवा ट्रस्टला १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.यासंदर्भात आता अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.