मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे इतरही आमदारांचा कल वाढल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांच्या १० आमदारांचेही अजित पवार गटाशी मिळते जुळते वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब एकत्र व्हावं, अशी प्रार्थनाच आज पंढरीच्या पांडुरंगाकडे केली आहे. पवार कुटुंबं एकत्र यावेत, असं अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी विठूरायाच्या चरणी साकडं घातल आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून आणि कुटुंबियांकडून करण्यात आली होती. मात्र अद्याप दोन्ही गट एकत्र येण्यास सहमत नाही आहेत. त्यात आता अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाला साकडे घातले आहे. आता हे साकडे कधीपर्यंत पुर्ण होते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.