मुंबई आणि अहमदाबादसाठी ४ विशेष वातानुकूलित गाड्या

0

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ४ विशेष वातानुकूलित ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या सेवांचा फायदा प्रसिद्ध संगीत गट “कोल्ड प्ले”च्या संगीत कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांनाही होईल.गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – अहमदाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष (२ सेवा) 01155 वातानुकूलित विशेष दि. २५.०१.२०२५ रोजी ००.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अहमदाबाद येथे त्याच दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा) 01156 वातानुकूलित विशेष २६.०१.२०२५ रोजी ०२.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (१ सेवा) थांबे : ठाणे, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, उधना, आणि वडोदरा संरचना : दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित आणि २ जनरेटर कार. दादर- अहमदाबाद- दादर वातानुकूलित विशेष (२ सेवा) 01157 वातानुकूलित विशेष दि. २६.०१.२०२५ रोजी ००.३५ वाजता दादर येथून सुटेल आणि अहमदाबाद येथे त्याच दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा) 01158 वातानुकूलित विशेष दि. २७.०१.२०२५ रोजी ०२.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १२.५५ वाजता पोहोचेल. (१ सेवा) थांबे : ठाणे, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, उधना, आणि वडोदरा. संरचना : दोन प्रथम वातानुकूलित, दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित आणि २ द्वितीय सिटिंग सह गार्ड्स ब्रेक व्हॅन. आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 01155 आणि 01157 वातानुकूलित विशेषसाठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेत स्थळावर सुरू आहे. विशेष गाड्यांच्या थांब्यावरील तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech