छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान टिकविला

0

शिवभक्त राजू देसाई यांनी वाहिली आदरांजली

मुंबई : शहाजीराजांनी भगवाध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना दिला याच ध्वजाला घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभे केले आणि हाच भगवा समर्थपणे पेलणाऱ्या दोनच महान व्यक्ती होऊन गेल्या. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या नंतर हिंदूह्रदुसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान भिनवून त्याला ताठ मानेने उभे केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीतून उभ्या राहिलेल्या मराठी माणसाने मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवून त्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे, अशा धगधगत्या शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक शिवभक्त श्री. राजू देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या वाढदिवसा/जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १४ च्या ठाकूर स्कूल येथील संस्कृती उपशाखेत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी तमाम शिवसैनिक व हितचिंतक जमले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास शिवभक्त राजू देसाई यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी बोलतांना शिवभक्त राजू देसाई यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चेतविलेली, पेटविलेली स्वाभिमानाची मशाल हाती घेऊन मार्गक्रमण करण्याची आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.

यावेळी संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री दादासाहेब शिंदे, महाराष्ट्र वाहतूक सेना चिटणीस श्री शाम साळवी, संपर्कप्रमुख श्री दशरथ मांजरेकर, मागाठाणे विधानसभा समन्वयक श्रीमती रोहिणी चौगुले शाखा समन्वयक श्री अमित मोरे, महिला शाखा समन्वयक सौ वनिता दळवी, उपशाखा संघटक सौ. संगीता चाचले, उपशाखा संघटक श्रीमती भाविका नवलू, ज्येष्ठ शिवसैनिक श्री वसंत तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech