अभिनेते विजय कदम यांचे निधन कर्करोगाशी झुंज अखेर संपली

0

मुंबई – विजय कदम यांचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीत मोठा दबदबा होता. त्यांनी अनेक प्रसिद्ध नाटकांतही काम केलेले आहे. विजय कदम चित्रपटात वा नाटकाच्या मंचावर दिसले की प्रेक्षकवर्ग खळखून हसायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी कर्करोगावर मातदेखील केली होती. पण दुर्दैवाने तो पुन्हा उद्भवला होता. यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय ६७ होते.

दरम्यान विजय कदम यांनी ऐंशी ते नव्वदच्या दशकात रंगभूमी गाजवली होती. त्यांनी टूरटूर, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा काचे अशा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या नाटकांत काम केलं. त्यांनी ती परत आलिया या मालीकेत साकारलेले पात्र तर खास चर्चेचा विषय ठरले होते. दे दणादण, दे धडक बेधडक, इरसाल कार्टी, तेरे मेरे सपनेमे अशा मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केलं. हळद रुसली कुंकू हसलं या मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका विशेष चर्चेची ठरली होती. विजय कदम यांच्या निधनानंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. कदम यांनी अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये काम केले होते आणि ही जाहिरात प्रचंड गाजली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech