अहमदनगर- उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल जैन समाजाच्या तेरा पंथ संप्रदायाचे आचार्य श्री महाश्रमण जी महाराजांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी त्यांच्याशी अनेक धार्मिक व सामाजिक विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
यावेळी अजित पवार यांनी जैन श्रमणसंघाचे उपाध्यक्ष प्रविण ऋषी जी महाराज यांचीही भेट घेऊन आशिर्वाद घेतले. या भेटीत पवार यांनी पूर्वीच्या अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी येथे आचार्य श्री आनंद ऋषी जी महाराजांच्या जन्मगावी सुरू असलेल्या गुरू आनंद तीर्थ प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच त्या भागात असताना संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सांगितले.