सुमारे ५०० उद्योजक एमआयडीसी कार्यालयावर धडकले

0

प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्याने कारखानदार आक्रमक

डोंबिवली – डोंबिवलीमध्ये अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर डोंबिवलीतील सर्वच कंपन्या डोंबिवली मधून स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उद्या सामंत यांनी दिल्यानंतर डोंबिवली प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांनी डोंबिवलीतल्या सर्वच कंपनीला नोटीस पाठवत तात्काळ स्थलांतरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर काही कंपन्यांना क्लोजर नोटीस नोटीस देऊन त्या कंपनीचे लाईट व पाणी कलेक्शन बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत या विरोधातच आज डोंबिवली मधल्या सर्व कंपनीच्या मालकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत प्रदूषण नियंत्रण अधिकारी व एमआयडीसी अधिकाऱ्यांना कार्यालयात घुसून जाब विचारला या वेळेला कंपनीच्या मालकांनी गोंधळ घालत स्थलांतराला विरोध असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech