चक्क शिवाजी महाराज यांच्या साक्षीने!!!”….. हरवलेल्या मुलाची आणि वडिलांची एक अनोखी गळा भेट

0

टिटवाळा (कल्याण) – प्रफुल्ल शेवाळे

इतिहासाचा साक्षात्कार व्हावा अशी घटना चक्क आज टिटवाळा मध्ये घडली. हरवलेल्या एका मुलाची (चिरंजीव पाठक) आणि त्याच्या वडिलांची एक अनोखी गळा भेट चक्क शिवाजी महाराज यांच्या साक्षीने पार पडली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. … विविध सांस्कृतिक कार्यक्रमामधून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारणारे टिटवाळा परिसरातील अभिनेते विशाल सदाफुले यांच्या चौकस बुद्धी ने आज एका हरवलेल्या मुलाची गळा भेट त्याच्या वडिलांना घेता आली.

आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई मध्ये कार्यक्रमाला जाण्यासाठी विशाल सदाफुले यांनी दुपारी पावणे दोनच्या सुमारास टिटवाळा स्थानकामधून मुंबईकरिता लोकल पकडली. नाशिकवरून पहाटे आल्याने प्रवासादरम्यान गाडीमध्ये एक झोप काढुया या हेतूने गर्दी कमी असलेल्या टिटवाळा लोकल मध्ये विशाल यांनी प्रवास सुरु केला.. डोळे मिटणार तेवढ्यात एक लहान दहा वर्षाचा निरागस मुलगा समोर आला आणि त्याने विचारले की अंकल ये ट्रेन कुर्ला जायेगी क्या? विशाल त्याला म्हणाले, हा बेटा कुर्ला जायेगी… यानंतर तो लहानगा तिथे बसला…त्यानंतर विशाल यांनी त्याला एकटे बसलेला पाहून सहज विचारले. तुझे मम्मी पप्पा कुठे आहे. तर तो म्हणाला मम्मी पप्पा घरपे है, मी बोललो इकडे कुठे आलास?

त्यावर तो म्हणाला इकडे मी क्लासला आलो होतो. विशाल यांनी स्वतः शी विचार केला कीं टिटवाळ्यातले सगळे क्लास बऱ्यापैकी आपल्या ओळखीचे आहेत.. त्याला नाव विचारलं नक्की कोणत्या क्लासला आला होतास.? त्यावर तो म्हणाला क्लासला नाही, शाळेत आलेलो. उडवाउडीचे उत्तर दिल्यानंतर विशाल यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली..जरा संशय वाटू लागला म्हणून त्याला नीट विचारलं नक्की टिटवाळ्यात कशाला आलास तू, त्यावर त्याने सगळे सांगितलं मी घरातून पळून आलेलो आहे का तर माझ्याकडून सकाळी मोबाईल खराब झाला आणि मम्मी पप्पा ओरडतील म्हणून मला घरी जायचं नाहीये. विशाल यांनी त्याला संपूर्ण डिटेल्स विचारले त्याला त्याच्या आई वडिलांचा फोन नंबर पाठ नव्हता. शाळेचे नाव विचारले, त्याच्या पुस्तकावर शाळेचे नाव होते पण शाळेला सुट्टी असल्यामुळे त्याच्या पुस्तकावर जो शाळेचा नंबर होता तो शाळेवाल्यांनी उचलला नाही.

त्याच्याकडे कोणत्याच प्रकारच शाळेच आयकार्ड नव्हतं ना त्याचं काही ओळखपत्र.. त्याची सगळी नोटबुक चेक केले.. ह्याच्यात एखादा नंबर सापडला तर सहज त्याची पुस्तकं चाळली तर त्यामध्ये एक नंबर मिळाला. तो त्याच्या मित्राचा निघाला. त्याच्या मित्राच्या नंबरवर फोन केला असता असे कळले की सदर मुलगा ऐरोली येथून गायब आहे आणि सकाळी चार वाजल्यापासून त्याचे आई-वडील त्याचे संपूर्ण नातेवाईक त्याला शोधत आहे. त्याची हरवल्याची पोलीस तक्रार केली आहे आणि ते खूप रडत होते. त्याच्या आईने व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर त्यांचे बोलणं झालं ते ऐकताना मला देखील भरून आले, यानंतर ठाण्याला त्याचे वडील त्या मुलाला घ्यायला आले. ह्या दोघांची भेट टिपण्यासाठीच एक छान असा व्हिडिओ बनवला. त्यातून त्या बापाची झालेली अवस्था आपल्याला दिसेल.अशी एक प्रकारे चित्रपट कथानक माहिती विशाल सदाफुले यांनी आम्हाला दिली आहे. विशाल यांच्या सामाजिक बांधिलकी प्रतिचे आजच्या घटनेने टिटवाळा परिसरातील नागरिकांकडून विशाल यांचे कौतुक होताना दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech