नव्या वर्षात ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाची धमाल ट्रीट

0

मुंबई : चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची ट्रीट देणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण असताना स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही नामवंत कलाकार मंडळी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे गमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले असून यात स्वप्नीलचा हटके लूक दिसतोय तर बाकीचे कलाकार घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसतायेत. त्यामुळे ही भानगड काय आहे? हे समजायला मार्ग नाही.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे. चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, भन्नाट कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech