पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये पिझ्झात आढळला चाकूचा तुकडा

0

पुणे – पिंपरी- चिंचवडमध्ये पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. इंद्रायणी नगर मध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी काल स्पाईन रोड येथील एका दुकानामधून पिझ्झा मागवला होता. पिझ्झा खात असताना त्यांना चाकूचा तुकडा त्यांना टोचल्याने ही बाब समोर आली. अरुण कापसे यांनी लगेच दुकानाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, सुरुवातीला मॅनेजरने त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली. नंतर पिझ्झाचे पैसे परत केले. मात्र अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दाखल केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech