“अनेक लोकांची विकेट काढायची आहे”

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २० मे) मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्यांतील मतदान झाले आहे. सोमवारी मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. “उद्या बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे”, असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघातील एका मैदानावर जाऊन क्रिकेट प्रेमींची भेट घेतली. राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार बॅटिंग केली. दरम्यान, सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असताना काही गौप्यस्फोटही करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २० मे) मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्यांतील मतदान झाले आहे. सोमवारी मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. “उद्या बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे”, असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघातील एका मैदानावर जाऊन क्रिकेट प्रेमींची भेट घेतली. राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार बॅटिंग केली. दरम्यान, सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असताना काही गौप्यस्फोटही करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech