चाकरमान्यांसाठी मुंबई ते कुडाळपर्यंत ४ अतिरिक्त रेल्वेच्या फेऱ्या

0

मुंबई – मध्य रेल्वे खाली दिलेल्या तपशिलानुसार आगामी गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांसाठी मुंबई ते कुडाळपर्यंत ४ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुडाळ 01181/01182 अनारक्षित विशेष – २ फेऱ्या. 01181 अनारक्षित विशेष गाडी दि. ०७.०९.२०२४ (शनिवार) रोजी १५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. 01182 अनारक्षित विशेष गाडी दि. ०८.०९.२०२४ (रविवार) रोजी ०४.३० वाजता कुडाळ येथून सुटेल आणि त्याच दिवशी १६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. संरचना 01181/01182 साठी : ३ शयनयान, ४ चेअर कार कोच आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह १३ जनरल सेकंड क्लास. (२० डब्बे)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुडाळ 01103/01104 अनारक्षित विशेष – २ फेऱ्या
01103 अनारक्षित विशेष गाडी दि. ०८.०९.२०२४ (रविवार) रोजी १५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मुंबई येथून सुटेल आणि कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. 01104 अनारक्षित विशेष गाडी दि. ०९.०९.२०२४ (सोमवार) रोजी ०४.३० वाजता कुडाळ येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई त्याच दिवशी १६.४० वाजता येथे पोहोचेल. संरचना 01103/01104 साठी : ४ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह १६ जनरल सेकंड क्लास. (२० डब्बे)

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा. माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

प्रवाशांना विनंती आहे की, वरील सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालतील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह, सुटण्यापूर्वी यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील. या ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या गणपती उत्सव विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech