कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 4.34 लाख मतदार

0

कल्याण – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 4.34 लाख मतदार; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे विशेष प्रयत्न असल्याची माहिती निवडणूक अधिकारी रोहित राजपूत यांनी दिली आहे. यावेळी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाल,महापालिकेचे अधिकारी प्रसाद ठाकूर आदी उपस्थित होते.

कल्याण पश्चिम मतदार संघात लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांच्या नावांचा घोळ झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत पुन्हा मतदार नोंदणी सुरू केली. या नोंदणीवेळी विधानसभा निवडणुकीपर्यंत 35 हजार मतदार वाढल्याची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.कल्याण पश्चिम मतदार संघात एकूण 441 मतदान केंद्र आहेत. यामधील शहरी भागात 439, ग्रामीण भागात 3 मतदान केंद्र आहे. मतदारांची मतदान करताना गैरसोय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी 27 पथके तैनात करण्यात आली असून ते दिवस रात्र काम करणार असल्याची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा शर्तीचे प्रयत्न केले असून मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा विश्वास देखील यावेळी निवडणुका अधिकारी राजपूत यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech