ठाणे – सलग १४ वर्षापासुन सुरु असलेली निर्माल्य व्यवस्थापनाची परंपरा याही वर्षी चालु ठेवत समर्थ भारत व्यासपीठ यांनी यंदा रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी व ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सवात ३२ टन निर्माल्य संकलित केली असुन, त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावुन खत निर्मिती केली जाणार आहे. सण-उत्सव पर्यावरण स्नेही व्हावेत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ गेल्या १४ वर्षापासुन ‘ हर बार इको त्योहार ’ ही मोहिम राबवित असतात. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवमध्ये निर्माल्य संकलित करुन त्यापासुन खत निर्मिती केली जाते. तयार झालेले खत ठाणे महानगरपालिकेच्या उदयानांमध्ये वापरले जाते.
गेल्या १४ वर्षांच्या प्रयत्नामुळे सजावटीतील प्लास्टिक व थरमॉकोलच्या वापरा विरोधात व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर ९५ टक्कांनी कमी झाला. यासोबत शाडु मातीच्या मुर्ती वापरणे, मुर्तीचा आकार लहान ठेवणे, घरच्या घरी, सोसायटीत अथवा कृत्रीम तलावामध्ये गणेश मुर्ती विर्सजित करणे यासाठी जनजागृती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या संयोगाने संस्था कार्यरत आहे. यंदा मासुंदा, ठाणे पुर्व, रेतीबंदर, रायलादेवी येथील गणेश विर्सजन घाटावर निर्माल्य संकलन मोहिम राबविण्यात आली.
जवळपास ३२ टन निर्माल्य यावेळी संकलन करण्यात आले. संकलित निर्माल्यावर कोपरी येथील प्रकल्प पुर्ननिर्माण येथे प्रक्रिया केली जात असुन, त्यापासुन खत निर्मिती केली जाणर आहे.अनंत चतुर्थीच्या दिवशी रेतीबंदर घाटावर गणेश आरासाचे देखील संकलन करण्यात आले.
ठाणेकर नागिकांनी निर्माल्य संकलन मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसात दिला यंदा एकही विर्सजन घाटावर पाण्यात निर्माल्य विर्सजित झाले नाही. या मोहिमेत समर्थ भारत व्यासपीठ, रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी व ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सक्रिय सहभाग घेतला.