ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधून दि.16 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 27 कोटी 68 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 15 कोटी 59 लाख 4 हजार रोख रक्कम, 3 कोटी 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, 1 कोटी 79 लाख 89 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 23 लाख 26 हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू / दागिने आणि 7 कोटी 5 लाख 25 हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात आली.