धुळे – काही दिवसांपूर्वी भगर खाल्ल्याने ५०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बुलडाण्यातील घटना ताजी असतानाच धुळ्यात १५० ते २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान, धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या ६३० प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरुवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलिस जवान हजर झाले. मात्र, जवानांचा रोल कॉल सुरू होताच अनेक जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला.