राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 वीर बालकांचा सन्मान

0

नवी दिल्ली : यंदा 14 राज्यांमधील 10 मुली व 7 मुले असे एकूण 17 बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, गुरुवारी राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी देशभरातील 17 वीर बालकांना पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्राच्या 2 धाडसी मुलींचा समावेश आहे. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी , राज्यमंत्री सावित्री ठाकूर तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा 14 राज्यांमधील 10 मुली व 7 मुले असे एकूण 17 बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech