मुंबई – राज्यातील वाढत्या तापमानाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. बीडमध्ये ४, रायगडमध्ये २रुग्णांची नोंद झाली आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.