ट्रम्प-पुतिन संवादातून शांततेची नवी आशा

0

Russia-Ukraine war Trump-Putin dialogue

ट्रम्प-पुतिन संवादातून शांततेची नवी आशा
वॉशिंग्टन : ट्रम्प हे धाडसी नेतृत्व आहे, अशी पुतिन यांनी प्रशंसा केली होती. आता ट्रम्प आणि पुतिन यांच्या संवादातून युद्ध थांबवण्यासाठी नवीन दिशा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.रशिया-युक्रेन युद्धाला अखेर शांततेची दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना नुकताच फोन केला असून, दोन्ही देशांमधील संघर्ष कमी करण्याबाबत चर्चा केली आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांच्याशी संवाद साधला होता. गेल्या आठवड्यात रशियामधील एका सार्वजनिक कार्यक्रमात पुतिन म्हणाले होते की, ट्रम्पसोबत चर्चा करणे चुकीचे नाही. जर दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारतील, तर त्याचे स्वागत आहे.

युक्रेन-रशिया संघर्ष थांबवण्याबाबत ट्रम्प यांची भूमिका निवडणूक प्रचारादरम्यानही स्पष्ट होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी रशियाच्या कब्जात असलेला भूभाग कायम ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवलेल्या ट्रम्प यांनी पुतिन यांना केलेल्या फोनमध्ये अमेरिकेचे सैन्य युरोपमध्ये असल्याची आठवण करून दिली. तसेच संघर्ष वाढू नये यासाठी पुतिन यांनी संयम दाखवावा,असा सल्लाही दिला. जुलैमध्ये ट्रम्प यांच्यावर हल्ला होण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेनंतर त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे पुतिन प्रभावित झाले होते. यामुळे ट्रम्प-पुतिन संबंध अधिक दृढ होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांनीही ट्रम्प यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन दिले असून, युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिका-रशिया संबंध सुधारले तर रशिया-युक्रेन संघर्षावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता वाढेल. ट्रम्प आणि पुतिन यांची आगामी धोरणे या संघर्षाच्या भवितव्यावर निर्णायक ठरू शकतात. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली. जेलेन्स्कीने युक्रेनला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला नाही. या दूरध्वनी वरील चर्चे दरम्यान, जेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech