रेल्वे तिकीट खिडकीवर ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध

0

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने आपल्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी आज १ एप्रिलपासून काही नवीन सुविधा सुरू केल्या आहेत. आजपासून रेल्वे प्रवाशांच्या ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी क्युआर कोड स्कॅनिंगची सेवा सुरू झाली आहे.

आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी करताना क्युआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय मिळणार आहे. मोबाईलवरील गुगल पे आणि फोन पेसारख्या युपीआय ॲप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करू शकतील. तिकीट खिडकीसोबतच पार्किंग आणि फूड काउंटरवर क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध असेल.आता प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.

अनेक स्थानकांवर ही सुविधा आधीच उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचप्रमाणे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे दंडही भरता येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडे हँडहोल्ड टर्मिनल मशीन असेल, त्यातील डिव्हाइसमध्ये क्युआर कोड दिसेल. क्युआर कोड स्कॅन करून दंड ऑनलाइन भरता येईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech