राणा यांनी माफी मागितली, मतभेद संपले

0

अमरावती – लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा भाजपाच्या राजापेठ स्थित कार्यालयात आल्या होत्या. त्यांचे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागत सोहळ्यात विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी ‘अबकी बार ४०० पार’मध्ये अमरावतीतून नवनीत राणा यादेखील असणार असे सांगत असतानाच अगोदर आमच्यात जे काही झाले ते आता सारे काही संपले आहे. राणांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली असल्याचे प्रवीण पोटे यांनी या सोहळ्याला संबोधित करताना सांगितले.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांना हनुमान चालीसा म्हणायला लावण्याचे धाडस नवनीत राणा यांनी केले आहे. खरंतर नवनीत राणा यांनी जे काम केले ते माझ्यासह भाजपाच्या सर्वांनी करायला हवे होते. मात्र, जे धाडस आम्ही करू शकलो नाही ते धाडस नवनीत राणा यांनी केले असे देखील आमदार प्रवीण पोटे म्हणाले. आता जिल्ह्यात आपल्या पक्षामध्ये तुझे आणि माझे हे अजिबात चालणार नाही. यापूर्वी जे काही घडलं ते सारं आपण गंगेला वाहिले असल्याचे प्रवीण पोटे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech