पंजाब डख लोकसभेच्या रिंगणात

0

मुंबई : देशभरात 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. या निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. प्रत्येक पक्षात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच आता हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे, पंजाबराव डख यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्यात आले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. पंजाबराव डख यांनी स्वत: परभणीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech