नागपूर : राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या असून आता आतुरता आहे निवडणूका निकाल येण्याची अशाच आज अनेक दिग्गज पुढाऱ्यांनी आपला मतदाना हक्क बजावला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. कामठीचे मतदार विजयी करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बावनकुळे यांनी पत्नी ज्योती, मुलगा संकेत, स्नुषा अनुष्का आणि मुलगी पायल यांच्यासह मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाचा जाहीरनामा आम्ही पूर्ण करणार आहोत. पुढील पाच वर्षे कामठीच्या जनतेची कामे करण्याचा संकल्प केला करताना कामठीची जनता माझ्यावर विश्वास ठेऊन विजयी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बावनकुळे कोराडी येथील बुथ क्रमांक 29 वर भाजपाच्या मतदार मदत केंद्रात सामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या रूपात पोहचले. बुथवर येणाऱ्या मतदारांचा अनुक्रमांक शोधून देण्यासह मतदानाची प्रक्रिया त्यांनी समजाविली व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. बुथवर असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.