मुंबई : शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल फेकल्याची माहिती समोर आली आहे. या राड्यात संजय निरुपम देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल फेकल्याचं समोर आले आहे, यावेळी निरुपम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. संजय निरुपम म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने ठाकरेंच्या शिवसेनेला मत देण्यासाठी घेऊन जात होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहे. अशातच मालाड पूर्व येथील पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.
विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी असी आवाहन केले जात असताना अनेक ठिकाणी आज गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबईत मालाडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला . त्यात उमेदवारानेही उडी घेतली. मालाड पूर्व पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.