मुंबईचे माजी पोलीस आयुक्त बिजू जनता दलाचे उमेदवार

0

मुंबई- ओडिशा राज्यात लोकसभेच्या १५ आणि विधानसभेच्या ७२ जागांसाठी निवडणुक होणार आहे. त्यातील पुरी लोकसभेसाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांना बिजू जनता दलाने (बीजेडी) निवडणूक रिंगणात उतरवले आहे. भाजपाचे नेते संबित पात्रा यांच्याशी पटनाईक यांचा सामना होणार आहे.

१९७९ च्या बॅचचे निवृत्त आयपीएस अधिकारी असलेले अरुप पटनायक यांनी यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे.त्यांना बीजेडीने पुरीमधून भाजपाच्या विरोधात लोकसभा उमेदवारी दिल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पटनायक यांनी लातूर आणि जळगावचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

मुंबईत त्यांनी उपायुक्त, पोलिस सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे. उपायुक्त असताना पटनायक यांनी १९९२-९३ ची जातीय दंगल, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट पत्रकार जेडे हत्या प्रकरण, हर्षद मेहता घोटाळ्याचा तपास करण्याची निःपक्षपातपणे कामगिरी बजावली होती. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांमध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण केली होती.पोलिसांसाठी चांगली घरे, त्यांना वैद्यकीय सुविधा यासारखे अनेक उपक्रम राबवले होते. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना शहरातील बारवर धाडी टाकण्यास मोकळीक दिली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech